Ad will apear here
Next
एप्रिलमध्ये विक्रमी १.१३ लाख कोटी जीएसटी जमा
जीएसटी लागू झाल्यापासूनचा विक्रम

नवी दिल्ली : २०१९-२०च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या म्हणजेच एप्रिल महिन्यात वस्तू व सेवा कर संकलनाने (जीएसटी) आतापर्यंतचा विक्रमी टप्पा गाठला असून, एकूण १.१३ लाख कोटी रुपये कर जमा झाला आहे. जुलै २०१७मध्ये हा अप्रत्यक्ष कर लागू केल्यापासूनचा हा विक्रमी टप्पा आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत त्यात दहा टक्के वाढ झाली आहे. 

सलग दोन महिन्यांमध्ये एक लाख कोटी रुपयांहून अधिक करसंकलन झाले आहे. यावरून वस्तू व सेवा कर व्यवस्था आता स्थिरावत असल्याचे स्पष्ट होत आहे. ई-वे बिल्स, प्रभावी माहितीसाठ्यावर आधारित कार्यवाही यांमुळे करचुकवेगिरीला आळा बसला आहे. करदात्यांकडून आर्थिक वर्षाअखेर कर जमा करण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेही करसंकलनात भर पडली आहे. वस्तू व सेवा कर परिषदेने मार्चमध्ये स्थावर मालमत्ता क्षेत्राकरिता करसुलभता प्रदान केली होती. त्याचाही लाभ झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील करसंकलनाच्या तुलनेत यंदा झालेली वाढ लक्षणीय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  


एप्रिलमध्ये झालेल्या या करसंकलनात केंद्रीय वस्तू व सेवा कराचे (सेंट्रल जीएसटी) प्रमाण २१ हजार १६३ कोटी इतके आहे, तर राज्य वस्तू व सेवा कर (स्टेट जीएसटी) २८ हजार ८०१ कोटी रुपये आहे. इंटिग्रेटेड जीएसटी ५४ हजार ७३३ कोटी रुपये असून, सेसचे प्रमाण नऊ हजार १६८ कोटी रुपये आहे. मार्च महिन्यापासून ३० एप्रिलपर्यंत ७२.१३ लाख ‘जीएसटीआर-थ्रीबी’ म्हणजेच कर विवरणपत्रे दाखल झाली आहेत. 

वर्षभरापूर्वी, एप्रिल २०१८मध्ये एक लाख तीन हजार ४५९ कोटी रुपये एवढा जीएसटी जमा झाला होता. वर्षभरात अप्रत्यक्ष कर संकलन १०.०५ टक्क्यांनी वाढले असल्याचे केंद्रीय अर्थखात्याने निवेदनाद्वारे जाहीर केले आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ७.६१ लाख कोटी रुपयांच्या करसंकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZZLCA
Similar Posts
भारताची निर्यात ३३१ अब्ज डॉलरवर; वाढीचा नवा विक्रम नवी दिल्ली : २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये भारताच्या निर्यातीत विक्रमी वाढ नोंदवली गेली असून, तब्बल ३३१ अब्ज डॉलरची एवढ्या मूल्याची निर्यात भारतातून झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत निर्यातीत नऊ टक्के वाढ झाली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये नोंदवण्यात आलेला निर्यातीचा विक्रम यंदा मोडीत निघाला आहे
दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण होणार नवी दिल्ली : देशातील दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (३० ऑगस्ट २०१९) नवी दिल्लीत केली. त्यामुळे सरकारी बँकांची संख्या २७वरून १२ होणार आहे. विलिनीकरणानंतर बँक कर्मचाऱ्यांची कोणतीही कपात केली जाणार नाही, असेही सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले
'जीएसटी' ची कमाल मर्यादा 40 टक्के शक्‍य अर्थसंकल्पीय अधिवेशनातच केंद्रीय कराचे विधेयक मांडणार नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा कर अर्थात "जीएसटी' ची कमाल मर्यादा 20 टक्‍क्‍यांवरुन वाढवण्याची शिफारस "जीएसटी' संचालक परिषदेच्या बैठकीत करण्यात आली आहे. त्यानुसार "जीएसटी'ची कमाल मर्यादा आता 40 टक्‍क्‍यांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. सध्या ही मर्यादा 14 टक्के आहे
मोदींच्या शपथविधीसाठी मराठमोळ्या शेफची ‘रेसिपी’ नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा शपथ घेणार असून, आज (३० मे २०१९) होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला जगभरातील अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह देशभरातील मान्यवर नेते आणि विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या महत्त्वाच्या सोहळ्याकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language